परभणी (Parbhani sports complex) : शहरातील क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून दुरुस्तीसाठी मंजूर झालेला निधी प्रशासनास प्राप्त न झाल्याने कामे रखडली आहेत.त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल (Sports Complex) दुस्तीसाठी मंजुर निधी कधी प्राप्त होणार हा प्रश्न खेळाडू, पालकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील खेळाडूंसाठी (Sports Complex) क्रीडा संकुलावर विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी जिल्हा क्रीडा अध्ािकारी कार्यालयाकडून सोई सुविधांची उपलब्धता करुन देण्यात येते. मात्र प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्व कामे प्रलंबीत आहेत. जर खेळाडूंना सुविधा मिळाल्या नाही तर राज्य, राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी कधी मिळणार आहे. सन २०२२ – २३ व २०२३ -२४ या दोनवर्षात जिल्ह्यातील फक्त १४ खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभाग, प्राविण्य प्राप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या वरुन जिल्ह्यात खेळाडूंसाठी असलेले खेळाचे वातावरण लक्षात येते.
मागील काही महिण्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रीडा संकुल परिसरात सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मैदान सेवक, लिपीक यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्याच्या द्वरे क्रीडा संकुलनाची सुरक्षा, साफ – सफाई करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सकारत्मक बदल झाले आहेत. मात्र क्रीडा संकुलनाची झालेली दुरावस्था सुधारण्यासाठी मुळ प्रस्तावानूसार मंजूर १५ कोटींचा निधी उपलब्ध होणे व सुधारीत प्रस्तावानूसार मागणी करण्यात आलेला निधी मंजुर होणे गरजेचे आहे. जर खेळाडूंना मुलभुत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत तर जिल्ह्याचे नेतृत्व राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय स्तरावर कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Sports Complex) जिल्हा क्रीडा संकुल दुरावस्थेकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने निधी उपलब्ध होत नाही.
११५ कोटींचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर
जिल्ह्यातील खेळाडूंना पुरेशा सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व (Sports Complex) क्रिडा संकुलनाची झालेली दुरावस्था दुरुस्थ करण्यासाठी ११५ कोटींचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास जिल्ह्याचे पालकमंत्री, क्रीडा मंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. सद्या राज्य शासनाकडे तो प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच शासनाकडून मुळ प्रस्तावानूसार १५ कोटींचा निधी मंजुर झाला असून तो आणखी उपलब्ध झाला नाही.
– कविता नावंदे, जिल्हा क्रीडाअधिकारी, परभणी