परभणी/ गंगाखेड(Parbhani):- शेतकरी बांधवांची कामे सुलभ व्हावी यासाठी अजंटा सेल्फ रिलायन्ट शेतकरी (Farmer)उत्पादक कंपनीच्या वतीने इफको कंपनीकडून उपलब्ध झालेल्या फवारणी ड्रोन(Spraying drones) यंत्राचे दि. २९ जून शनिवार रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
इफको कंपनीकडून फवारणी ड्रोन उपलब्ध
गंगाखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी कार्यरत असलेल्या अजंटा सेल्फ रिलायन्ट शेतकरी उत्पादक कंपनीने इफको कंपनीकडून उपलब्ध झालेल्या फवारणी ड्रोन यंत्राचे दि. २९ जून शनिवार रोजी गंगाखेड येथील राणीसावरगाव रस्त्यावर असलेल्या सुविधा केंद्रात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार कैलास वाघमारे, तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) प्रभाकर बनसावडे आदी मान्यवरांसह अजंटा शेतकरी कंपनीचे संचालक सतिष आडे, बालासाहेब बारगिरे, बाळासाहेब खाकरे, रोहिदास निरस आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी रोहिदास निरस यांनी कंपनीच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तर बाळासाहेब खाकरे यांनी पुणे येथील पीबीएस ऍग्रो हब (PBS Agro Hub) या संस्थेकडून अधिकृतरित्या प्रशिक्षण घेतलेले ड्रोन फवारणी यंत्र कंपनीच्या सभासद, बिगर सभासदांसह सर्व शेतकऱ्यांना फवारणीसाठी योग्य दरात भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम औषधी, वेळ व पैसा बचत होणार
या उपक्रमासाठी इपको कंपनीसोबत शेतकरी उत्पादक कंपनीने करारनामा करत ड्रोन यंत्र (Drone device) उपलब्ध करून घेतले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी बांधवांना शेती पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम औषधी(Medicine), वेळ व पैसा बचत होणार असून सोबत लिक्विड खते ही वापरता येणार असल्याने गंगाखेड, पालम तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन अजंटा सेल्फ रिलायन्ट शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी केले आहे.