Parbhani suicide case :- शहरातील शाहु नगरात एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. मृतकाजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये दोघांचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मृतकाजवळ आढळली चिठ्ठी
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय अंकुश वावळे (वय ३५ वर्ष, रा. शाहु नगर) असे मयताचे नाव आहे. सदर तरुणाने राहत्या घरी सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच नानलपेठ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलिस करत आहेत.