परभणी/ताडकळस(Parbhani):- येथुन जवळच असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीने स्वतः च्या घरात पत्र्याखाली लावलेल्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना रविवार ६ आँक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
शनिवारी कळगाववाडी येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू (death) झाल्याची घटना घडली असतांनाच दुसऱ्या दिवशीही आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी की ताडकळस येथुन जवळच असलेल्या माखणी येथील मच्छिंद्र मधुकर गाडे यांनी खबर दिली की, त्यांची बहीण कु.वैष्णवी मधुकर गाडे वय १७ वर्षे ही इयत्ता १२ वीला वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता अज्ञात कारणाने स्वतः च्या घरात पत्र्याखाली लावलेल्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, बिट जमादार गणेश लोंढे, पोकाँ भगवान चोरघडे आदी पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरील मृतदेह (dead body) शवविच्छेदनासाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम चव्हाण, डॉ.आश्विनी कोल्हे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी परभणीतील ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे माखणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.