परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील घटना
परभणी (Parbhani Suicide) : दुचाकी घेण्यासाठी होणारी पन्नास हजार रुपयांची मागणी, चारित्र्यावर घेतला जाणारा संशय आणि करण्यात येणारी मारहाण या त्रासाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या (Parbhani Suicide) केल्याची घटना शनिवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे घडली. विवाहितेस आत्महत्येस प्रवृतत केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर १८ ऑगस्टला परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा
निकिता विनोद भोकरे वय २७ वर्ष रा. टाकळी कुंभकर्ण, असे मयत विवाहितेचे नाव आहे. या बाबत मयताचे वडिल विलास वाघमारे यांनी तक्रार दिली आहे. सदर मुलीचा गावातील एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. यानंतर मुलगी सासरी राहण्यास होती. सासरची मंडळी लहान सहाण कारणाने मुलीला त्रास देत होते. या (Parbhani Suicide) बाबत मुलीने आई- वडिलांना सांगितले. दुचाकी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये तसेच चारित्र्यावर संशय घेत मारहाण करण्यात आली. सासरच्या या त्रासाला कंटाळून निकिता हिने १७ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विनोद दत्तराव भोकरे, शांताबाई दत्तराव भोकरे, प्रभाकर दत्तराव भोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. चव्हाण करत आहेत.