परभणी (Parbhani Swimming pool) : जलतरणिका तलाव (Swimming pool) अनाधिकृतरित्या सील करुन खोटा पंचनामा केल्या बाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिलीप प्रसादराव मोरे यांनी निवेदनाद्वारे (Parbhani Police) पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन
जलतरणिका तलाव (Swimming pool) मंगळवार १४ मे रोजी महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने मालमत्ता व्यवस्थापक नसीरोद्दिनकाजी यांनी सील करतेवेळी कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही. जलतरणिका तलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना अनाधिकृतरित्या तलाव सील केला. या बाबत दिलीप मोरे यांनी माहिती घेतली असता सदर ठिकाणी जमा असलेली ७ लाख २५ हजार ३०० रुपये रोकड, महत्वाची कागदपत्र, उपकरणे यांची वापसी व माहिती देण्यात आली नाही. तसेच पंचनाम्यामध्ये कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. ही मनपा कर्मचारी, अधिकारी घेवून गेले. परत दिली नसल्या कारणाने मोठे नुकसान झाले. पंचनाम्यामध्ये (Mahavitran) विद्युत पुरवठा पंचांसमक्ष बंद केल्याचे लिहिले आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
परंतु, सदर ठिकाणी अद्यापही विद्युत पुरवठा सुरू आहे. कारवाई बाबत पंचांशी विचारणा केली असता त्यांनी येथील रक्कम, कागदपत्र व साहित्य मनपाचे अधिकारी काजी घेवून गेले, असे सांगितले. तुम्हाला परत ताबा देतावेळी सदर सदरील गोष्टी वापस करण्यात येतील, असे सांगण्यात आले. लाईट बंद करताना महावितरण किंवा (Municipal Corporation) महापालिका विद्युत विभागाचा कर्मचारी उपस्थित नव्हता. लाईट बंद न करता खोटा पंचनामा तयार केला आहे. दिलीप मोरे यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला असता रक्कम, कपडे, कागदपत्र या बाबत योग्य माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकरणात मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, मालमत्ता व्यवस्थापक काजी यांच्यावर फसवणूक केल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिलीप मोरे यांनी निवेदनाद्वारे (Parbhani Police) पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.