दुकानातील शिल्लक असलेला खत व बी- बियाण्यांची माहिती लिहून ठेवण्याचे आदेश
परभणी(parbhani):- खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. बळीराजाही खरिपाच्या तयारीला लागला आहे. नेहमीची बी-बियाण्यांची व खताची होणारी साठेबाजी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा दुकानासमोरील दर्शनीय भागात फलक लावून त्यावर दुकानातील शिल्लक असलेला खत व बी- बियाण्यांची माहिती लिहून ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशालाच कृषी (agriculture)निविष्ठा धारकांनी केराची टोपली दिली असून मोंढ्यातील कृषी निविष्ठा(Agricultural inputs) दुकानातील दर्शनीय भागात खत साठ्याची नोंदही नसून कोरेच फलक असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे प्रचंड नुकसान
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे प्रचंड नुकसान(damage), त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणे, तसेच शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त कृषी निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच घेतलेल्या खरीप जिल्हास्तरीय आढावा बैठकीत कृषी विभागाला (Department of Agriculture) कृषी केंद्रांवर असलेल्या बी- बियाण्यांचा, खतांचा साठा, झालेली विक्री आणि शिल्लक याबाबतचा मोठा फलक दुकानाच्या दर्शनीय भागात लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंत्रणेला दिल्या होत्या.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी खुद्द आदेश देऊनही मोंढा भागातील कृषी निविष्ठा दुकानातील दर्शनीय भागातील फलकावर कोणत्याही प्रकारची नोंद असलेली दैनिक देशोन्नतीने (Deshonnati)केलेल्या पाहणीत पहावयास मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशालाच कृषी निविष्ठाधारकांनी केराची टोपी दिली काय? असा प्रश्न उपस्थित होत आहेत..