परभणी/सेलू (Parbhani):- येथील पुल पहिल्याच जोरदार झालेल्या पावसाने पुर आल्यामुळे पी. सी. सावंगीला जोडणारा पूलच चक्क वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्यामुळे त्याचे बांधकाम (Construction) किती निकृष्ट झाले हे सिद्ध झाले आहे. परिसरात मंगळवारी ९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल वाहून गेला आहे.
१ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून पुलाचे काम निकृष्ट
दरवर्षी पावसाळ्यात पी. सी. सावंगी या गावाजवळून वाहणाऱ्या करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे या गावाला जोडणारा रस्ता पुलाअभावी पाण्याखाली जात असल्याने येथील ग्रामस्थांसह, शेतकरी(farmer), नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. तर पावसाळ्यात प्रत्येक नागरिकांना बैंक, बाजार वा इतर कामाकरिता सेलू या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र, पावसाळ्यात या गावाचा पाच-पाच दिवस तालुक्याशी संपर्क दरवर्षीच तुटत असे. वास्तविक पाहता गावाजवळून वाहणाऱ्या करपरा नदीवर पूल(bridge) होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे २०१८ मध्ये या पुलासाठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आणि पुलाचे काम सुरू झाले. मात्र निकृष्ट होत असलेल्या कामामुळे हा पूल करपरा नदीला आलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेला.
दरम्यान सुरवातीपासूनच हे बांधकाम निकृष्ट (Inferior) होत असल्याची ओरड होत होती. शेवटी मंगळवार ९जुलै रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्यावर निकृष्ट कामाबद्दल शिक्कामोर्तब झाला. यामुळे निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाधकाम अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी गावातील नागरिकांतून केल्या जात आहे.