मध्यरात्री कारने घेतला पेट; कार जळून खाक
देशोन्नती प्रतिनिधी
परभणी/पाथरी(Parbhani):- तालुक्यामध्ये मागील २४ तासात आग(fire) लागण्याच्या दोन घटना घडल्या . शुक्रवारी मध्यरात्री खेडूळा पाटीजवळ उभ्या असणाऱ्या एका कारला अज्ञात कारणाने आग लागली तर गुरुवारी दुपारी याच परिसरात एका खोडवा उसाच्या (sugar cane) शेतात आग लागल्याची घटना घडली . दोन्ही ठिकाणी पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाने(fire brigade) तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली.
पाथरीत २४ तासात दोन आगीच्या घटना
तालुक्यातील खेडुळा पाटी जवळ सेलू पाथरी रस्त्या शेजारी शुक्रवार १० मे रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास भानुदास दिवाण यांच्या मालकीची कार विटभट्टी जवळ उभी होती . यावेळी या कारने अचानक पेट घेतला . यासंदर्भात पाथरी अग्निशामक दलाला माहीती देण्यात आली होती . अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत कारच्या इंधन टाकीत स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते . सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जिवितहानी झाली नाही . तत्पूर्वी याच परिसरात १२ तासांपुर्वी गुरुवार ९ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास विशाल पामे यांच्या शेतातील खोडवा उसात आग लागली होती.
उसाच्या शेतात आग
याही ठिकाणी पाथरी न .पा.च्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यावेळी सदरील शेतऱ्याचा ऊस जळून आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान दोन्ही आगीच्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाच्या शारेफ खान, खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळे यांनी परिश्रम घेतले .