वाहतुक शाखेचे दुर्लक्ष कुणाचा बळी जाण्याची वाट पाहताय का ?
परभणी (Parbhani):- दिवसें दिवस बसस्थानक परिसर हा अपघाताचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. काल ट्रक व ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडलेला कारचालक बालंबाल बचावला.जमलेल्या नागरीकांनी वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचार्यांना सूचना दिली. त्यानंतर आलेल्या कर्मचार्यांची कोंडी सोडवली. या ठिकाणी कायमस्वरुपी पोलिस (Police) कर्मचारी का नियुक्त केला जात नाही, असा सवाल घटनास्थळी जमलेल्या नागरीकांतून उपस्थित केला जात होता.
बसस्थानक परिसर हा अपघाताचा केंद्रबिंदू बनत चालला आहे
परभणी शहरातील वाहतुकी व्यवस्था दिवसें दिवस विस्कळीत होत आहे. मात्र वाहतुक शाखेला याचे काहीही सोयरसुत राहिले नाही. उड्डाणपुल मार्गे बसस्थानक ते रेल्वेस्थानक या मार्गावर सतत जड वाहनासह ऑटोरीक्षा, दुचाकी व इतर वाहनांची वर्दळ सुरु असते. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उड्डाणपुलाकडून एमएच.२६ एडी – ४४८५ क्रमांकाचा ट्रक, एमएच.०९ ईएम – ३६०९ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स रेल्वेस्थानकाकडे येत होती. याच सुमारास एमएच- २२- ८०५१ कार सुध्दा येत होती. वाहने एकमेकांना ओव्हरटेक (Overtake) करत असताना दोन्ही जड वाहनांच्या मध्ये कार सापडली. कारचालक थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली, मात्र कुठेही वाहतुक पोलिस कर्मचारी दिसत नव्हता.