रुग्णवाहिकेच्या (Ambulances) सहाय्याने वृध्दाला रुग्णालयात दाखल
परभणी (parbhani) :- लातुरहून परभणीकडे प्रवाशी घेऊन आलेल्या बसमध्ये एक वृध्द प्रवाशी बेशुध्द अवस्थेत आढळून आला. बस कर्मचार्यांनी तात्काळ हालचाली करत प्रवाशाजवळील मोबाईलच्या मदतीने नातेवाईकांशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेच्या (Ambulances) सहाय्याने वृध्दाला रुग्णालयात दाखल केले.
हा प्रकार सोमवार ६ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास परभणी येथील बसस्थानकात घडला. राज्य परिवहन महामंडळाची(State Transport Corporations) एमएच २४ एव्ही ७७३२ या क्रमांकाची बस लातुरहून प्रवाशी घेऊन परभणीला आली. बसमधून सर्व प्रवाशी उतरले. यावेळी एक वृध्द (old man) प्रवाशी बसमधून उतरला नाही. वाहकाच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी प्रवाशाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशी बेशुध्द झाला होता.
कर्मचार्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत हालचाल केली
बसमधील वाहक एस.डी. सरवदे, चालक एस.व्ही. डोंगरे यांनी याची माहिती प्रवाशी मित्र बाळासाहेब रेवणवार यांना दिली. त्यांनी वरिष्ठांना कळविले. प्रवाशाजवळील मोबाईल घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. बेशुध्द (unconscious) झालेल्या प्रवाशाचे नाव रघुनाथ फडके वय ७९ वर्ष, रा. जुना पेडगाव रोड असे असल्याचे समजले. वृध्दाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस कर्मचार्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत हालचाल केली.