परभणी(Parbhani):- शहर महानगरपालिकेने वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या बचावासाठी क्यूआरटी पथकाची(QRT) स्थापना केली आहे.
डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पथकात ॲम्बुलन्ससह(Ambulance) तज्ञ डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून तापमानाचा (Tempreture)पारा ४५ अंश पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानापासून हैराण झाले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून परभणी शहर महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या उन्हापासून बचावासाठी किंवा क्यूआरटी पथकाची स्थापना केली आहे.
उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयांत पाठविण्याची व्यवस्था
सदरील ॲम्बुलन्स ही शहरातील विविध भागात तैनात करण्यात आली आहे राजगोपालचारी उद्याण, नारायण चाळ, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका परिसर खानापूर फाटा, अपना कॉर्नर, विसावा फाटा आणी एमआयडीसी (MIDC)आदीसह शहराच्या विविध भागांत क्यूआरटी पथक अंम्बुलन्ससह थांबणार आहे. या पथकामध्ये वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांना व्यवस्था करण्यात आली आहे. मळमळ होणे किंवा ऊन लागल्याची लक्षणे जाणवणे, चक्कर येणे ,थकवा येणे अशी लक्षणे जाणवल्यास योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. रूग्ण गंभीर (severe)असल्यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयांत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर (युपीएचसी) या मार्फत देखील सल्ला व उन्हापासून बचाव कसा करावा? त्याचा काय परिणाम होतो? आदींची माहिती व जनजागृती शहरातील विविध ठिकाणी करण्यात येत आहे. या पथकामार्फत ऊन लागलेल्या रुग्णांची नोंद देखील घेण्यात येत आहे.
परभणीत तापमानाचा यंदाचा उच्चांक
शहरात मागील शनिवारी वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शनिवारी शहरीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तसेच काल रविवार देखील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांनी देखील वाढत्या ऊन्हापासून नागरिकांना बचावाचे आवाहन केले आहे. तसेच महापालिकेने देखील याविषयी तात्काळ कार्यवाही करत क्यूआरटी पथकाची स्थापना केली आहे.
महानगरपालिका सज्ज
सततच्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महापालिकेच्या वतीने क्यूआरटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकात एका सुसज्य ॲम्बुलन्ससहित एक तज्ञ डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी आणि अन्य एक ते दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शहरातील विविध भागांमध्ये हे पथक थांबणार आहे. याद्वारे वाढत्या उन्हापासून नागरिकांच्या बचावासाठी सल्ला देणे जनजागृती करणे आणि ऊन लागलेल्या नागरिकांस ताबडतोब वैद्यकीय सुविधा मिळविण्या मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.