परभणी(Parbhani) :- सन १९९१ च्या पुजास्थळ अधिनियमाची अंमलबजावणी करावी, बाबरी मस्जीद(Babri Masjid) उध्दवस्त करणार्यावर कठोर कारवाई करावी या मागणी बाबत विविध सामाजिक संघटनांनी शुक्रवार ६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला भेट
सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया यांनी दिलेल्या निवेदनावर अब्दुल रहेमान कादरी, हाफिज सय्यद मोहतसीन, मुज्जमील खान, सय्यद अब्दुल कादर, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, मौलाना रफियोद्दिन आशरफी, साजीद बेलदार, बदर चाऊस, मुफ्ती तलहा, हाफिज जिया उर रहेमान, हफिज आमेर, यांच्या स्वाक्षर्या आहेत. त्याच प्रमाणे हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर अॅड. आसेफ पटेल, शेख शमशोद्दिन, खैसर खान, सय्यद मुजाहेद, मुक्तार मिर्झा, शेख सुलेमान, अॅड. शहानवाज खान, शेख शोएब, समीर अन्सारी, खाजा पटेल, इम्रान खान, साजीद बेलदार, असलम खान, अब्दुल अलीम, मोईन मौली, सय्यद रईस, शेख जमीर यांच्या स्वाक्षर्या आहेत. मुस्लीम अधिकारी परिषदेच्या वतीनेही प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर समन्वयक वहिद पटेल, अॅड. शहाबाज खान, इम्रान खान, अलिम बाबा, अब्दुल वाजेद, शेख निहाल, शेख असलम, शेख इरशान, सय्यद मुजाहेद, अॅड. आसेफ पटेल, असलम पठाण, एजाज कुरेशी, सुलेमान शेख, सय्यद मतीन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.