परभणी/सेलू(Parbhani):- शहरात एम आय एम पक्षाच्यावतीने कोल्हापूर येथील विशाळगडावरील अतिक्रमण (Encroachment) काढण्यासाठी जमलेल्या जमावाने विशाळगडा पासून दूर अंतरावर असलेल्या गाजापूर व मुस्लिम वाडीला लक्ष्य करत तेथील घरे, दुकाने, वाहनांची जाळपोळ करून मस्जिद व दर्गाहात तोडफोड केली.
तातडीने आरोपींना गजाआड करून कठोर शिक्षा द्यावी
ही घटना रविवार १४ जुलै रोजी घडली. या घटनेतील आरोपींची विशेष चौकशी करून या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेऊन तातडीने आरोपींना गजाआड करून कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सेलू एम आय एम पक्षाच्या वतीने गुरूवार १८ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उप मुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे सेलू देण्यात आली आहे .निवेदनात विशाल गडा वरील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा असताना तेथे जमलेल्या दंगेखोरांनी विशाल गडापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गजापूर व मुसलमान वाडीला आपले लक्ष केले त्या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांची घरे, दुकाने, वाहने जाळून नष्ट करण्यात आली. प्रार्थना स्थळांचीही तोडफोड करण्यात आली.
कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून हे पीडित मदतीसाठी दारोदारी भटकत आहेत
यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून हे पीडित मदतीसाठी दारोदारी भटकत आहेत त्यांना राज्य व केंद्र शासनाने तातडीने आर्थिक मदत करून या जाळपोळीस जबाबदार असलेल्या सर्व दंजखोराना तातडीने अटक करवी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर एम आय एम पक्षाचे मार्गदर्शक शेख इसाक पटेल, एम आय एम पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष ॲड शेख वहिद, एम आय एम पक्षाचे सेलू शहर अध्यक्ष अबरार बेग, उपअध्यक्ष शेख इब्राहीम, सिकंदर खान, मझहर पठाण, शेख रफीक, शेख मुकतार, मोहसीन खान, सय्यद इमरान, शेख इरफान पटेल, सय्यद सोहेल, शेख आलेम शेख खालेद यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.