परभणी/मानवत (Parbhani):- गस्तीवर असलेल्या पोलीसांना मानवत ते पाळोदी रोडवर रस्त्याच्या कडेला एक संशयीत वाहन उभे असल्याचे दिसले. पोलीस वाहनाला पाहून सदर वाहन पळविण्याच्या प्रयत्नात असताना वाहन रस्त्याखाली असलेल्या चिखलात अडकले. पोलीसांनी वाहनातील संशयीतांना ताब्यात घेतले असता सदर व्यक्तींजवळ दरोड्यासाठी लागणारे साहित्य (Material) मिळून आले. ही कारवाई शनिवार २७ जुलै रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास मानवत पोलीसांनी केली. आरोपींवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case)करण्यात आला आहे.
पोलीसांचे पथक रात्र गस्तीवर असताना या पथकाला पाळोदी रोडवर संशयीत वाहन दिसले
मानवत पोलीसांचे पथक रात्र गस्तीवर असताना या पथकाला पाळोदी रोडवर संशयीत वाहन दिसले. पोलीसांना पाहून अधांराचा फायदा घेत एकजण पळून गेला. तर पोलीसांनी शैलेश कारभारी भोसले, सतिश रामभाऊ चव्हाण, सोनुसिंग पुनमसिंग टाक, जितेंद्रसिंग अवतारसिंग जुनी यांना ताब्यात घेतले. संबंधीता जवळील गाडीची तपासणी केली असता वाहनामध्ये ३ खंजीर, कुलूप उघडायची टॉमी, लोखंडी रॉड, मिरची पुड, कोयता, पक्कड, दोरी, कुलूप, कटर तोडायची स्टार असे साहित्य मिळून आले. सदर इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.