परभणी/जिंतूर(Parbhani):- यलदरी रस्त्यावर मोंढा परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचा (construction department)नाकर्तेपणाचा निषेध करून चक्क खड्यात फुले टाकून नारळ फोडून पूजा करून शेवडी येथील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन दिनांक 29 जून रोजी केले आहे.
जिंतूर यलदरी रस्त्यावरील खड्यांची पूजा
मागील अनेक दिवसांपासून जिंतूर शहरातून यलदरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस (rainy days) असल्यामुळे खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना खड्याचा अंदाज येत नसल्यामुळे नेहमी अपघात घडत आहेत. यामुळे बऱ्याच जणांना मोठी दुखापत झाली आहे असाच प्रकार शेवडी येथील शेतकरी विष्णू मुंडे व शिवाजी सानप शहरात शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास आले होते. यावेळी परत गावी जात असताना यलदरी रोडवरील खड्यात गाडी पडल्यामुळे किरकोळ जखमी (injured) झाले होते. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्याची फुले टाकून व नारळ फोडून अनोखे आंदोलन केले. यावेळी दोन्ही शेतकऱ्यांनी सा बा विभागाचा निषेध करून लवकर खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.