परभणी (Parbhani):- जिल्ह्यात पिकविमा संरक्षणासाठी आयसीआयसीआय लोंम्बार्ड (ICICI Lombard) विमा कंपनीस कंत्राट देण्यात आले आहे. मात्र ऐन आवेदन करण्याच्या काळात कंपनीचे जिल्हा मुख्य कार्यालय शनिवार, रविवार बंद (Closed)राहते त्यामुळे अनेक शेतकरी (Farmer) कार्यालयात येतात त्यांना आर्थिक भुर्दंड(Financial crisis) बसतो. या विषयी आणि पिकविम्याविषयी विचारले असता कंपनीच्या व्यवस्थापकांनी कुठलीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कंपनीला शेतकर्यांविषयी किती कणव असणार ? हे दिसून येते.
१ रुपयात विमा संरक्षण
प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, खरीप ज्वारीसह इतर पिकांना केवळ १ रुपयात विमा संरक्षण घेता येते. योजने अंतर्गत सोयाबीन व कापूस (Soybeans and cotton) पिकास ५५ हजार रुपये, तूर ३८ हजार ८०२ रुपये, मूग व उडीद २२ हजार रुपये, ज्वारी २९ हजार ७५० रुपये पिकविमा संरक्षण मिळणार आहे. योजने अंतर्गत येत्या सोमवार १५ जुलै पर्यंत शेतकर्यांना क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा मध्यस्त, पोस्ट ऑफीस, बँक आणि सीएससी केंद्रांवर पिकविमासाठी केवळ १ रुपया भरून ऑनलाईन अर्ज करता येतो.