परभणी/गंगाखेड(Parbhani):- मकर संक्रांतीनिमित्त भोलारामजी कांकरिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार १४ जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान शहरातील झोपडपट्टी भागातील गरजूंना ब्लँकेट व तीळ गुड वाटप करण्यात आले.
भोलारामजी कांकरिया चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
ट्रस्टच्या सचिव सौ. मंजूताई दर्डा यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे झोपडपट्टी धाराकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यरत भोलारामजी कांकरिया चॅरिटेबल ट्रस्टच्या (Charitable Trusts) सचिव सौ. मंजूताई दर्डा यांच्या वतीने सोमवार १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी शहराच्या आजूबाजूला झोपडी करून राहणाऱ्या गरजू झोपडपट्टी धारकांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत उबदारतेची आवश्यकता लक्षात घेऊन सुमारे १०० झोपडपट्टी धारकांना ब्लँकेटसचे वाटप केले. या ऊबदार ब्लँकेटस (Blankets)वाटपाबरोबरच ट्रस्टच्या वतीने तिळगूळ वाटप करत गोड बोला, गोड वागा हा संदेश देण्यात आला.
यावेळी ट्रस्टच्या सौ. मंजूताई दर्डा, डॉ. प्रीती छल्लानी, पूजा दर्डा, सिद्धार्थ दर्डा, ऋषभ दर्डा, अमर करंडे आदींसह ट्रस्टचे सदस्य आणि स्वयंसेवक उपस्थित होते.