परभणी(Parbhani):- भिक्षा मागणार्या तृतीय पंथीयांना मारहाण(beating) केल्या प्रकरणी परभणीतील नवा मोंढा आणि ताडकळस पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भिक्षा मागितली तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली
नवा मोंढा पोलीस ठाण्यात अक्षरा शेख यांनी तक्रार दिली आहे. पिंगळीकडे जाणार्या कॅनॉलवर(Canal) भिक्षा मागत उभ्या असताना विशाल, अज्जु शेख व इतर एका अनोळखीने मारहाण केली. संबंधिता जवळील पाच हजार रुपये रोख, एक मोबाईल काढून घेतला. याठिकाणी पुन्हा भिक्षा मागितली तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. तर ताडकळस पोलीस ठाण्यात मंगळवार १६ जुलै रोजी तक्रार देण्यात आली आहे. या ठिकाणी तृतीय पंथीयाने दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, भिक्षा मागत असताना तीन जणांनी जबर मारहाण केली. त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान मागील काही दिवसात परभणी शहरामध्ये तृतीय पंथीयांवरील हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. या बाबत जिल्हाधिकार्यांना देखील निवेदन (statement) देण्यात आले आहे.