Parbhani :- परभणीतील मानवत व सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये शरिराविरुद्ध गुन्हे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, दंगा करणे, प्राणघातक हत्यारांसह जमावबंदी, सार्वजनिक शांततेचा भंग, फौजदारी पात्र धाकदपटशा अशा स्वरूपाच्या गुन्हात सहभाग व गंभीर स्वरूपाची गुन्हे (Crime) दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी शैलेश लहोटी यांनी शुक्रवारी काढले आहेत .
वाहतुकीच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या इतर व्यक्तींविरुद्धही लवकरच हद्दपारीची कारवाई करण्यात येणार
महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ (१)(अ)(ब) नुसार मानवत येथील अभय अर्जुन दहे आणि कोठाळा ता. सोनपेठ येथील उत्तम मंचक पवार या दोन गुन्हेगाऱ्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी २५ एप्रिल रोजी हा आदेश जारी केला. अभय अर्जुन दहे यास परभणी व नांदेड जिल्ह्यातून, तर उत्तम मंचक पवार यास परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच, अवैध गौण खनिज (Illegal minor minerals) उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या इतर व्यक्तींविरुद्धही लवकरच हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही लाहोटी यांनी दिली.