देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani Vaccination ) : यावर्षी परभणी जिल्ह्यातून हज यात्रेकरिता जाणाऱ्या यात्रेकरूंचे (Parbhani hospital) जिल्हा रुग्णालय परभणी व जिल्हा हज कमिटी यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयात रविवार १९ मे रोजी लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते. यात ४२८ यात्रेकरूंना लस देण्यात आली. (Parbhani District) परभणी जिल्ह्यातून यावर्षी (Hajj pilgrimage) हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात मेनिंजायटीस, पोलिओ, इन्फ्लुएंझा, लसीकरण (Vaccination) ठेवण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने हज यात्रेकरूंचे लसीकरण
यामध्ये २४० पुरुष व १८८ स्त्री यात्रेकरूंना मेनिंजायटीस व पोलिओची लस देण्यात आली. तर (Hajj pilgrimage) ४५ यात्रेकरूंना इन्फ्लुएंझाची लस (Vaccination) देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे, यांचे अधिनस्त वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा हज कमिटी परभणीचे सय्यद जमील, अब्दुल बाशीद, जिल्हा हज कमिटीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.