परभणी (Parbhani):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डिजे(D.J) लावून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये (Police Station)करण थोरात, राजकुमार पायघन, हनुमान पायघन, विनोद कांबळे, अक्षय भागवत यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.नवा मोंढा पोलीस ठाण्यात किरण वाव्हळे, संकेत डोंगरे, विशाल बाजळ, कृष्णा खरजुले, पिराजी खरात, प्रमोद बोराडे, कुणाल लांडगे, राजेभाऊ सुर्यवंशी, योगेश उबाळे, गौतम थोरात, शिवानंद सुर्यवंशी, अक्षय गोरे, सचिन कांबळे, विकास गायकवाड, कार्तिक साळवे, शाम सुरवसे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात पंकज सावळे, किशोर पाचपुते, शाम कदम, विशाल सावंत, विष्णू कांबळे, सुदाम चव्हाण, शिवाजी नेटके, हितेन तलरेजा, कुशाल कांबळे, करण सावंत यांच्यावर गुन्हा (Crime)नोंद झाला आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात रमेश मोहिते आणि डिजे चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.