खाजगी, सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान; विविध पोलीस ठाण्यात नोंद
परभणी (Parbhani Violence) : संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचा निषेध म्हणून बुधवार ११ डिसेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. आंदोलना दरम्यान दुपार नंतर आंदोलनकर्ते हिंसक झाले. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये खाजगी तसेच सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर प्रकरणी परभणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सपोनि. बंदखडके यांनी तक्रार दिली आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून ते नारायण चाळ कडे जाणारा रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी खाजगी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यात आले. या तक्रारीनुसार जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५० व्यक्तींसह इतर ३०० ते ४०० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोनि. शरद मरे करत आहेत.
या (Parbhani Violence) ठिकाणी झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरी फिर्याद पोउपनि. कार्तिकेश्वर तुरनर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अचानकपणे विना परवाना रास्ता आडवून रास्ता रोको आंदोलन करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ८० ते १०० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार बी.ए. बिक्कड यांनी तक्रार दिली आहे.
बुधवारी सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान विसावा फाटा येथे (Parbhani Violence) जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी १३ व्यक्तींसह इतर ४० ते ५० जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. पवार करत आहेत. कोतवाली पोलीस ठाणे हद्दित भिम नगर येथे उड्डाणपुला जवळ मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी सम्राट कोरडे यांच्या फिर्यादीवरुन १३ जणांसह इतर १०० ते १२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोउपनि. मुजळगेकर करत आहेत. दरम्यान पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.
एसटी बसवर दगडफेक
जिंतूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अज्ञात इसमांनी एसटी बसवर दगडफेक करुन काचा फोडत १५ हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली. एसटी चालक अजय बोडखे यांच्या तक्रारीवरुन अज्ञातावर (Parbhani Violence) जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. राठोड करत आहेत.
मारहाण करणार्यांवर गुन्हा
परभणी : संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे नुकसान केल्याने जमलेल्या जमावातील काहींनी नुकसान करणार्याला चोप दिला. (Parbhani Violence) जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात ११ डिसेंबरला अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अगोदर विटंबना करणार्या आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व इतर कलमांखाली नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.