परभणी (Parbhani):- जायकवाडीच्या डावा व निम्न दुधनेच्या उजव्या कालव्याच्या पाण्यापासून परभणी व मानवत तालुक्यातील ६० ते ७० गावातील शेतकरी (Farmer)वंचित आहेत. त्यांना शेतीसाठी तात्काळ पाणी(water) मिळण्यासाठी शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. अन्यथा गुरा-ढोरांसहीत आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
शेतमजूर गुरां-ढोरांसहीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगीतले
3 जिल्ह्यातील जायकवाडीच्या डाव्या कालवा व निम्न दुधनेच्या उजव्या कालव्याच्या मधील भागातील ६० ते ७० गावे या प्रकल्पांच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने विकासापासून दूर आहेत. त्या संदर्भात या गावातील सरपंच, सोसायटी चेअरमन, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांनी बुधवार २४ जुलै रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत शेतकर्यांना पाणी मिळण्यासाठी ठोस उपाययोजना ५ ऑगस्टपर्यंत करण्याचे कळविले. अन्यथा ९ ऑगस्ट पासून या वंचित गावांमधील शेतकरी, शेतमजूर गुरां-ढोरांसहीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगीतले. या निवेदनावर रंगनाथ सोळंके, शिवाजी बोचरे, आकाश लोहोट, नागेश शिराळ, माणिक काळे, केशव अवचार, मदन शिंदे, कृष्णा शिंदे, सुभाष जाधव, अर्जून साबळे, हरीभाऊ निर्मळ, प्रभाकर शिंदे, भानुदास शिंदे, जगदीश गोरे, विकास काकडे, सखाराम शेळके यांसह परिसरातील वंचित शेतकर्यांच्या स्वाक्षर्या(signatures) आहेत.