परभणी(Parbhani) :-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गंगाखेड रोडवर १५ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत २९ हजार ४०० रुपयांच्या गुटख्यासह एक दुचाकी मिळुन ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना
याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलीसात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोनि अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शना खाली स्थागुशाच्या पथकाने केली. पोह दिलावर खान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसापासून परभणी जिल्ह्यात गुटख्याची मोठी साखळी पाहायला मिळत आहे मात्र या साखळी मागच्या मुख्य सूत्रधाराच्या पत्ता लागत नसल्याचे शहरात चर्चा सुरू आहे