परभणी/बोरी (Parbhani water) : यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस न पडल्यामुळे गावाला (Water supply) पाणीपुरवठा करणार्या ग्रामष्-पंचायतीच्या विहिरीची पाणीपातळी खालवल्यामुळे बोरी गावाला पाणी टंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई (water shortage) कायमस्वरूपी दूर करण्यासाठी केंद्र शासनाने गावाला कोट्यावधी रुपयांची जलजीवन मिशनद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अजूनही काम पूर्ण झाले नाही.
जलजीवन मिशनच्या कामाचा उडाला बोजवारा
बोरी येथे जलकुंभ बांधण्यात आले परंतु याचे काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे. करपरा धरणावरून धरणावरून येणार्या जलवाहिनीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावातील अंतर्गत जोडणीचे काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे. या कामावर देखरेखीसाठी जिल्हा परिषद (Water supply) पाणीपुरवठा विभाग व जीवनचे अधिकारी फिरकत नसल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. कामासाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात येत आहेत.
जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत
गावाला टँकरने पाणीपुरवठा (Water supply) करावा लागत आहे. बोरी येथे गेले एक महिन्यापासून भीषण (water shortage) पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. टँकरने (Water supply) पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर तीन विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी विनायक पुंड यांनी दिली.