परभणी/ सोनपेठ (Parbhani) : येथील पोलीस स्थानकात पोलीस दल स्थापन दिनानिमित्त दि 6 जानेवारी सोमवारी रोजी सकाळी 11:30 च्या दरम्यान रायझिंग डे (Rising Day) निमित्ताने शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात शहरातील व्हिजन पब्लिक स्कूल (Vision Public School) शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सोनपेठ पोलीस स्थानकात ‘रायझिंग डे’ निमित्ताने पोलीस विभागाकडून (Police Department) शस्त्र प्रदर्शन (Weapon Display) भरविण्यात आले होते. यामध्ये कार्बाईन गन, गॅस गन, एस एल आर पिस्टल, हॅंन्ड ग्रॅनाईट व सेलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस स्थानकाचे शस्त्र विभाग, वाहतूक विभाग, सुरक्षा हेल्पलाईन, वायरलेस यंत्रणा,कामकाज सुविधा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चे नियम व विविध गुन्हे संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच रायझिंग डे निमित्ताने नागरिकांना, वाहन चालकांना, हेल्मेट विषयी, यांसह अन्य संदर्भात मार्गदर्शन केले आहे. या प्रदर्शनात शहरातील व्हिजन पब्लिक स्कूल च्या 50 ते 60 शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शस्त्रांचे प्रदर्शन यशस्वी
सोनपेठ येथे रायझिंग डे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी रायझिंग डे निमित्ताने शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शस्त्रांचे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोउनि अजय किरकण, पोलीस नायक संजय रासवे, कृष्णा तिडके, हुंडेकर आदींनी परिश्रम घेतले आहे.