परभणी (parbhani wedding) : दिवसेंदिवस विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण बिघडत आहे. त्यात लग्नात लावण्यात येणार्या डि.जे. मुळे विवाह सोहळे उशिरा पार पडत आहेत. (wedding ceremony) विवाह सोहळा म्हणजे दोन कुटुंबाचा एकत्र येण्याचा एक शुभ क्षण होय. त्यामुळे लग्न कार्यात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रांसह अनेकजण एकत्र येतात. त्यावेळी भेटीगाटीमध्ये शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण, एकमेकांविषयी खुशाली आदी चर्चा घडतात. मात्र हल्लीच्या लग्न सोहळ्यात वरातीत लग्नस्थळी लावण्यात येणारे डि.जे. ऑक्रेस्ट्रा यांचा गोंधळ वाढत चालला आहे. परिणामी विधीला कमालीचा विलंब होत असल्याने वेळेवर लागणारे लग्न उशिरा लागत आहेत.
डिजेमुळे लागत आहेत उशिरा लग्न
तसेच पुर्वी विवाह सोहळ्यांमध्ये सनई, चौघड्यांची जागा शरीराला घातक अशा मोठ-मोठया डेसीमल आवाजाच्या डिजेंनी घेतले आहे. त्यावर नृत्य करणारे वेगळाच उत्साद मांडतात. त्यामुळे (wedding ceremony) विवाह सोहळा हा इव्हेंन्ट बनला आहे. पूर्वी विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च टाळला जात होता. मात्र सध्या खर्चामध्ये बेसुमार वाढ झाली आहे. त्यात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. पूर्वीच्या लग्नाच्या जेवणावेळी भारतीय बैठक पध्दतीने पंगती बसत होत्या. जेवणामध्ये मोजकेच परंतू रुचकर पदार्थ होते. केळी किंवा पळस यांच्या पाणापासून बनविलेल्या पत्रावळी होत्या. मात्र आता बफे पध्दतीने जेवण स्वत:ला घ्यावे लागते. पात्रात किती आणि कोणते अन्न घ्यावे याचा अंदाज या बफेमुळे येत नाही.
अन्नाची होत आहे नासाडी
म्हणून जास्तीचे अन्न अनेक वेळा घेतले जाते व ते शेवटी फेकून दिल्यामुळे अन्नाची नासाडी होत आहे. यामध्ये प्लास्टीकच्या फेकून दिलेल्या पत्रावळी व इतर वस्तु गुरे-ढोरे खात आहेत. तसेच मोठ-मोठया आवाजांचे वाजविण्यात येणारे फटाके यांमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण मानवी जिवनास हनीकारक ठरत आहे. (wedding ceremony) लग्न समारंभात फोटो सशेनचा अतिरेक वाढत चालला असून फक्त फोटो पुरते लग्नात उपस्थिती लावली जात आहे. फोटो झाला की प्रत्येकजण मंडपातून निघून जात आहे. त्यामुळे विवाह हे सोहळे नसून इव्हेंन्ट बनले आहेत.
आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी होतोय
पुर्वी लग्नामध्ये स्वकीय, नातेवाईक, आप्त तसेच मित्रांच्या भेटी-गाटी होत असत. आणि यामध्ये विविध विषयांवर चर्चा होत होती. त्यामुळे एकमेकांविषयी अपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाढत होता. सध्या या पध्दतीमध्ये बदल होत चालला असून गरजेपूरते एकमेकांची विचारपूस केली जात आहे. यामुळे या बदलत्या (wedding ceremony) विवाह सोहळ्यांमुळे सामाजिक अभिसरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.