3 लाखाचा मुद्देमाल लंपास
परभणी (Parbhani):- अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रकमेसह २ लाख ९२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २८ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील घटना
रामेश्वर बालासाहेब गोंगे यांनी तक्रार दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून घरातील आतील खोलीचे कुलूप (lock) तोडले. खोलीत प्रवेश करत लोखंडी पेटीचा कोंडा कुलूप तोडून त्यातील रोख २ लाख १० हजार रुपये आणि ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे मिळून एकूण २ लाख ९२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी (burglary) झाल्याचे लक्षात आल्यावर रामेश्वर गोंगे यांनी पाथरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. पोउपनि. थोरवे तपास करत आहेत.
घरातील सर्व सदस्य छतावर
उन्हाळ्याचेदिवस (summer days) असल्याने घरातील सर्व सदस्य छतावर झोपायला गेले होते. ज्या खोलीमध्ये चोरी झाली. त्याच्या समोरच्या खोलीत बालासाहेब गोंगे झोपलेले होते. परंतु त्यांना जाग आली नाही. पहाटेच्या सुमारास त्यांच्या पत्नी उठल्या असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पाथरी पोलीसात तक्रार देण्यात आली.