परभणी (Parbhani) :- दारुबंदीच्या निवेदनावर स्वाक्षर्या घेत असलेल्या एका महिलेला स्वाक्षर्या घेऊ नकोस असे म्हणत वाईट उद्देशाने तिचा हात धरुन विनयभंग करण्यात आला. ही घटना २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील सातेफळ येथे घडली.
आरोपी महेंद्र कांबळे याच्यावर गुन्हा दाखल
सदर प्रकरणी परभणीच्या चुडावा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सदर महिला दारुबंदीच्या (Prohibition of alcohol) निवेदनावर स्वाक्षर्या घेत असताना आरोपी महेंद्र कांबळे याने “निवेदनावर सह्या घेऊ नकोस” असे म्हणत हात पकडून महिलेच्या गळ्यात हात घालत तिच्या सोबत झटापट करुन विनयभंग (molestation) केला. तसेच शिवीगाळ (Abusing)केली. आरोपी महेंद्र कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुखेडकर करत आहेत.