परभणी जिल्हयातील पुर्णेच्या रेल्वे वसाहतीतील घटना
परभणी/पूर्णा (Parbhani woman body) : येथील रेल्वे वसाहतीत पॉवर हाऊसच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात रक्तबंबाळ, अर्धनग्न अवस्थेत एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह शनिवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. (woman body) महिलेच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेल्वे वसाहतीत पॉवर हाऊसच्या मागे झाडाझुडपांनी वेढलेले मोकळे मैदान आहे. या मैदानात मृतदेह मिळून आला.
घातपाताचा संशय ची जोरदार चर्चा
रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मृतदेहाची (woman body) माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोनि. विलास गोबाडे, सपोनि. सोमनाथ शिंदे, फौजदार केंद्रे, रमेश मुजमुले, सपोउपनि. अण्णा माने, अजय माळकर, बंडू राठोड, संदीप चौरे, घारगीळ, रंगनाथ दुधाटे, पवन लांडगे यांनी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. श्वान पथक, ठसे पथकाला पाचारण करण्यात आले.
महिलेच्या मृत्यू मागे काय कारण आहे, कोण व्यक्ती आहे, याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळाला सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, वाघमारे यांनी भेट दिली. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. (woman body) मयत महिलेचे नाव रमाबाई अनिल चिकाटे रा.सिध्दार्थ नगर असल्याचे पोनि.विलास घोबाळे यांनी सांगीतले.