उंदराचे औषध घेतल्याने रुग्णालयात उपचारसाठी केले होते दाखल
परभणी/सेलू (Parbhani Woman Death) : तालुक्यातील झोडगाव येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने उंदराचे औषध खाल्ल्यामुळे उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. असता उपचारादरम्यान तीचे निधन (Parbhani Woman Death) झाल्यामुळे २४ मार्च रोजी दुपारी एक वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती, याप्रमाणे तालुक्यातील झोडगाव येथील संगीता अशोक हिंगे वय ३५ वर्षे या विवाहित महिलेने ११ मार्च रोजी रात्री ७ वाजता उंदराचे औषध खाल्ल्यामुळे या (Parbhani Woman Death) विवाहितेस छत्रपती संभाजीनगर मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या विवाहीतेचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.
या प्रकरणी विवाहितेचा पती अशोक बाबासाहेब हिंगे राहणार झोडगाव यांनी दिलेल्या खबरे वरून कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या (Parbhani Woman Death) विवाहित महिलेने उंदराचे औषध घेण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.