परभणी तालुक्यातील झरी येथील घटना सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Woman Suicide) : सासरकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने माहेरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार २१ मे रोजी घडली. (Parbhani Woman Suicide) विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर २२ मे रोजी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षी चंद्रप्रकाश लाटे वय २१ वर्ष, असे मयत विवाहितेचे नाव आहे. या बाबत मयताचे वडिल बाबाराव ननवरे यांनी खबर दिली आहे. साक्षी हिचे लग्न सन २०२२ मध्ये गावातील चंद्रप्रकाश लाटे याच्या सोबत लावून देण्यात आले होते. (Parbhani Woman Suicide) लग्नानंतर काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी साक्षीला त्रास देण्यास सुरुवात केली. या बाबत बैठका झाल्या. मात्र कोणतीही तडजोड झाली नाही. साक्षी ही माहेरी राहत होती. २१ मे च्या सायंकाळी साक्षी फोनवर नवर्यासोबत बोलत होती. थोड्यावेळाने फिर्यादीने मुलाला साक्षी कुठे आहे, असे विचारले.
मुलाने घरच्या वरच्या मजल्यावर जावून पाहिल्यावर वडिलांना आवाज दिला. फिर्यादी वरती गेले असता त्यांना साक्षीने ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. तिला खाली उतरुन झरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. (Parbhani Woman Suicide) पुढे परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान बुधवारी दहाच्या सुमारास साक्षीचा मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चंद्रप्रकाश लाटे, भिकुदास लाटे, प्रमिला लाटे, दैवत लाटे, सुजाता लाटे, दयावंती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.