संरक्षक भिंती अभावी रुग्णालयात मुक्त वावर
नातेवाईकांनी केला व्हिडिओ व्हायरल
रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नातेवाईकांनी केला व्हिडिओ व्हायरल
रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
– श्रीकांत देशमुख
परभणी (Parbhani Women Hospital) : ज्या रुग्णालयात डुकरांच्या मुक्त वावराने तेथील डॉक्टरांसह कर्मचारीच भयभीत असतील..तर तेथे येणाऱ्या रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेचे काय ? असा सवाल सध्या परभणी येथील स्त्री रुग्णालयात (Parbhani Women Hospital) उपस्थितला जात आहे.. संरक्षक भिंतीअभावी चक्क रुग्णालयातच दिवसभर डुकरांची रेलचेल पहावयास मिळत आहे. याबाबत रुग्णालयाच्या आत डुक्कर फिरत असल्याचा व्हिडिओच रुग्णांच्या नातेवाईकांनी व्हायरल केला आहे.त्यामुळे हे (Women Hospital) स्त्री रुग्णालय आहे की डुकरांचे माहेरघर हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट्यावधींचा निधी खर्च करून स्वतंत्र स्त्री रुग्णालय परभणी (Parbhani Women Hospital) येथील दर्गा रोड येथे बांधण्यात आली. मात्र या ठिकाणी मागील बाजूस संरक्षक भिंतच नसल्याने डुकरांचा थेट प्रवेश रुग्णालयात होत आहे. येथील मागील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याकरिता अंदाजपत्रक ही मागवली आहे. मात्र याकरिता ३ कोटी रुपयांचा निधी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.. मात्र या निधीची पूर्तता केव्हा होणार व संरक्षण भिंत कधी बांधण्यात येणार हा सवाल परभणीकरांतून ऊपस्थित केला जात आहे.
डुकरांनी चावा घेतल्यास जबाबदार कोण… ?
स्त्री रुग्णालयात संरक्षक भिंत नसल्यामुळे चक्क रुग्णालयातच दिवसभर डुकरांची रेलचेल पहावयास मिळत आहे..येथे जिल्हाभरातून प्रसूती करिता आलेल्या महिला व त्यांचे नातेवाईक असतात. यात अनावधानाने चुकून एखाद्या डूकराने रुग्ण किंव्हा नातेवाईकास चावा घेतल्यास त्यास जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधीक्षकांचा पत्रव्यवहार ; मात्र प्रतिसाद नाही..
याबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक नरेन वर्मा हे रुजू झाल्यापासून त्यांनी वेळोवेळी याबाबत (Medical College) वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप पर्यंत जाळी दुरुस्तीचे किंवा संरक्षकभिंतीचे काम मार्गी लागले नाही.
संरक्षक भिंती ऐवजी लावली जाळी; तीही तोडली डुकरांनी
स्त्री रुग्णालयाच्या मागील बाजूस सुरक्षेकरिता संरक्षक भिंतच हवी. मात्र त्या ऐवजी प्रशासनाने त्या ठिकाणी सुरक्षा जाळी लावली. मात्र तीही डुकरांनी खालून तोडली. व खालून मागच्या बाजूने असलेल्या गेटमधून डुक्कर आत मध्ये प्रवेश करत आहेत..
अधिष्ठात्यांना कळवले आहे, शेजारील मोकळ्या जागेत काही लोकांनी ब्रीडिंग स्पॉट साठी डुक्कर आणून सोडले आहेत. बाजूच्या तार फेंसिंग ला तोडून, माती उकरून डुक्कर आत येत आहेत. आणि अस्वच्छता करत आहेत. याबाबत सुरक्षा भिंतीची अत्यावश्यकता आहे.याबाबत एनएचएम विभाग, शासकीय वै. महाविद्यालय अधिष्ठाता यांना त्वरित कळवलेले आहे. लवकरच याबाबत कार्यवाही होईल.
– डॉ. नरेन वर्मा, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय, परभणी.
महापालिकेला सांगून बंदोबस्त करण्यात येईल…
स्त्री रुग्णालयाच्या (Parbhani Women Hospital) मागील बाजूस संरक्षक जाळी लावलेली आहे. मात्र जाळीला तोडून खालून डुकरे आत प्रवेश करीत आहेत. याकरिता लवकरच महापालिकेला सांगून डुकरांचा बंदोबस्त केला जाईल…
– डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधिष्ठाता ,परभणी