Parbhani:- राशन दुकानावर मिळणारे रॉकेल (Kerosene) बंद झाल्यानंतर शासनाने उज्वला योजना आणली त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लाभार्थी असून दर महा एक गॅस सिलेंडर मिळते मात्र सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना गॅस (Gas) परवडत नाही. उज्वला योजनेतील लाभार्थी पुन्हा चुलीकडे वळले आहेत अनेक महिलांच्या (Women) डोक्यावर लाकडाची मोळी दिसून येत आहे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे सद्यस्थितीत सर्वच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत.
हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना गॅस परवडेना
त्यातच गॅस सिलेंडरचे (Cylinder) दरही हजाराच्या आसपास गेल्याने गोरगरिबांचे बजेट बिघडले आहे रॉकेल आता बंद झाल्याने गोरगरिबांना चूल पेटवावी लागत आहे ग्रामीण भागातील महिलांना भर उन्हात जंगलातून (Forest) लाकडी आणून स्वयंपाक करावा लागतो यामुळे महिलांना धुरापासून त्रास होतो यापासून मुक्तीसाठी शासनाने सिलेंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला सबसिडी बऱ्यापैकी मिळत होती मात्र ही सबसिडी टप्प्याटप्प्याने अत्यल्प करण्यात आली गोरगरिबांना गॅसच्या वाढत्या किमतीत सिलेंडर घेणे परवडत नाही घराघरात विविध शासकीय योजनेतून गरीब कुटुंबांना निशुल्क (Free charge) गॅस ची जोडनी देण्यात आली मात्र मागील काही वर्षात सिलेंडरच्या दरात तिपटीने वाढ झाली त्यामुळे एकदा संपलेला गॅस गरीब कुटुंबांना घेण्यास परवडत नसल्यामुळे महिलांना सरपन शोधून चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे गॅस सिलेंडरचे वाढलेले दर कमी करण्याची मागणी महिला करत आहे.