परभणी/जिंतूर(Parbhani):- तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार २३ जूलै रोजी सकाळी ११वा. येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले,यावेळी महिलांसह नागरिकांची मोठ्याप्रमाणावर जलसमाधी आंदोलनाला उपस्थिती होती.
सरकारच्या वेळ काढून धोरणाचा मराठा समाजा कडुन निषेध
अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथील सन्माननीय मनोज जरांगे (Manoj Jarange)पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळ काढून धोरणाचा जाहीर निषेध म्हणून जलसमाधी आंदोलन सकल मराठा समाजाच्या(Maratha society) वतीने करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून मराठा योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असुन अगोदरच मागील अनेक वर्षांपासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झाली.
कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामहून काही एक विचार करत नसताना दिसत आहे
त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामहून काही एक विचार करत नसताना दिसत आहे. शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकार ने लवकर सरकारने सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी,मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या करत जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी आंदोलन स्थळी तहसिलदार राजेश सरवदे नायब तहसिलदार प्रशांत राखे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी (police officer)चंद्रसेन देशमुख पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त(police arrangement) ठेवण्यात आला होता.