परभणी तालुक्यातील तरोडा येथील घटना
परभणी (Parbhani youth suicide) : नैराश्यात गुमसुम राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलाने गळफास (youth suicide) घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास परभणी तालुक्यातील तरोडा येथे घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ईश्वर सखाराम शेळके वय १६, असे आत्महत्या (youth suicide) केलेल्या मुलाचे नाव आहे. या बाबत रामा पुरभाजी काकडे यांनी खबरदिली आहे. ईश्वर हा नेहमी गुमसुम राहत होता. कोणाला जास्त बोलत नव्हता, तो कोणत्यातरी कारणावरुन ईश्वरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच सपोनि. विक्रम हराळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. मुलगीर करत आहेत.
कर्करोगाचा आजार आणि त्यातच महाराष्ट्र बँकेचे असलेले १ लाख ५९ हजार रुपयांचे पीक कर्ज या विवंचनेत एका २९ वर्षीय युवकाने विषारी द्रव प्राशन केले. उपचारा दरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाला. या (youth suicide) प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास परभणीतील शासकीय रुग्णालयात घडली. मनोज सखाराम लाडाणे वय २९ वर्ष, असे मयताचे नाव आहे. या बाबत कल्पना लाडाणे यांनी खबर दिली आहे. तपास मपोउपनि. बळेगाव करत आहेत.