गायक मिलिंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी…!
परभणीतील डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांचा उपक्रम
परभणी (Parbhani Yugapravarta) : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त आश्रय सेवाभावी संस्थेतर्पेâ बुधवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव (Parbhani Yugapravarta) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायत मिलिंद शिंदे यांच्या भीमगीत संगीत रजनी होणार असल्याची माहिती आयोजक काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Parbhani Yugapravarta) यांच्या जयंतीनिमित्त डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे हे मागील २१ वर्षापासून युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे आयोजन करत आहेत. या वर्षीही हा महोत्सव ३० एप्रिल रोजी वसमत रोडवरील विष्णू जिनिंग मैदानावर सायंकाळी ६ वाजता होत आहे. अभिवादन सोहळा झाल्यानंतर आपल्या आवाजाने महाराष्ट्रातील रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे सिने पार्श्वगायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीत संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे.
या (Parbhani Yugapravarta) कार्यक्रमातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे सादर करणार्या जयंती मंडळाना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे. या अभिवादन महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आयोजक डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.