जिल्हा परिषदमध्ये उमेदवारांची गर्दी, सभागृहात उमेदवार घामाघुम
परभणी (Parbhani Zilla Parishad ) : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत सहभागी घेणार्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी (Parbhani Zilla Parishad) जिल्हा परिषदेमध्ये करण्यात येत असून नियोजना अभावी गोंधळ उडाल्याचे पहावयास मिळाले. तर सभागृहात फॅन असून सुध्दा बंद अवस्थेत असल्याने सर्वांचे हाल होत आहेत. जिल्हाभरातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत (Youth training Yojana) सहभागी उमेदवारांची शनिवार १० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत कागदपत्रे तपासणी करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अशा सर्वांची तालुका निहाय कागदपत्रांची तपासणी होत आहे.
मात्र जिल्ह्यातील बहुसंख्य बेरोजगार उमेदवारांनी गर्दी केल्याने व प्रशासनाने नियोजन न केल्याने काही काळ गोंधळ उडाला. गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मनुष्यबळ प्रशासना कडे उपलब्ध नव्हते. उमेदवारांना त्यांच्या तालुक्यानुसार नोंदणी करून टोकन देण्यात येत आहे. परंतू नियोजन नसल्याने टोकन घेऊन सुध्दा कागदपत्रे तपासणी होत नाही. तर जिल्हाभरातून आलेले उमेदवारांची सभा गृहातील पंखे असून सुध्दा बंद असल्याने हाल होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा (Youth training Yojana) प्रशासनाच्या नियोजना अभावी गोंधळ होत असल्याने त्यामुळे योग्य ते नियोजन होण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या उमेदवारांचे हाल, गैरसोय होणार नाहीत.
अधिकार्यांनी प्रतिक्रीया देणे टाळले
जिल्हा परिषदेतील (Parbhani Zilla Parishad) सभागृहात युवा प्रशिक्षण योजनेच्या जिल्हाभरातील उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यावेळी नियोजना अभावी गोंधळ उडाल्याचे निदर्शनास आले. त्या विषयी तेथील उपस्थित जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संदिप घोन्सीकर यांना याविषयी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.