परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन!
परभणी (Parbhani) : राज्यात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडल्या. निवडणुकीचे निकाल अनाकलनीय, अश्चर्यकारक आहेत. निवडणुकीत गडबड झाल्याचे दिसते. निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षपातीपणा न करता निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे, लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासर्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे ही मागणी करत परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार 25 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना निवेदन!
लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्याच्या अंतरात 50 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानादिवशी तसेच दुसर्या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्क्यामध्ये तफावत आढळून आली. रात्रीच्या अंधारात वाढलेल्या मतदानाचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस (Congress) पक्षाने आंदोलन करुन जिल्हाधिकार्यांना (District Collector) निवेदन सादर केले. निवेदनावर माजी आ. सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खा. तुकाराम रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब फुलारी, दिगंबर खरवडे, अतिक उर रहेमान, सत्तार पटेल, अब्दुल सईद, वैजनाथ देवकेत, विशाल बुधवंत, सुहास पंडित, नागनाथ काकडे, आर.एस. देशमुख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.