खा. फौजिया खान सह जिल्हाधिकारी, एसपि, मनपा आयुक्तांनी केली पाहणी!
परभणी (Parbhani) : स्त्री रुग्णालयात डुकरांचा असणारा त्रास व इतर समस्या जाणून घेण्याकरिता राज्यसभा खा. फौजिया खान यांनी स्वतः मंगळवार 28 रोजी भेट देत, तेथील असलेल्या समस्या जाणून घेत त्वरित मनपाला तेथील डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांची उपस्थिती होती.
स्त्री रुग्णालय की, डुकरांचे माहेरघर; रुग्णांसह कर्मचारीही भयभीत. दैनिक देशोन्नतीने मंगळवार 28 जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच; याची तात्काळ राज्यसभा खा. फौजिया खान यांनी दखल घेत, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) रवींद्रसिंह परदेशी यांना सोबत घेत त्यांनी मंगळवार 28 रोजी स्त्री रुग्णालयाची पाहणी करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेन वर्मा यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या तेथे असणाऱ्या डुकरांच्या बंदोबस्ता करिता त्वरित मनपा प्रशासनाला कळविले. सोबतच स्त्री रुग्णालयात असणाऱ्या पाण्याच्या टंचाई संदर्भात नळ कनेक्शन वाढवने, रुग्णालयातील पार्किंगचा असणारा प्रश्न, तसेच तात्पुरत्या स्वरूपात टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी मनपा प्रशासनास (Municipal Administration) त्यांनी दिल्या.
संरक्षक भिंती संदर्भात सा. बा विभागाला केले आदेशित!
यावेळी स्त्री रुग्णालयात (Hospital) मागील बाजूस लावलेल्या संरक्षक जाळी ऐवजी संरक्षक भिंतच हवी अशी मागणी यावेळी खा.फौजिया खान यांनी केल्यानंतर याबाबत कार्यवाई बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) सा. भा विभागाला तोंडी आदेशित केले. दैनिक देशोन्नतीचे वृत्त प्रकाशित होताच; गांभीर्य ओळखत स्त्री रुग्णालयाची पाहणी करण्याकरिता राज्यसभा खा. फौजिया खान (Fauzia Khan) यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव,उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, मनपा अभियंता पंकज देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेन वर्मा यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.