Parbhani:- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील लोहरा ते मंगरूळ रस्त्याचे मागणीसाठी मागच्या एक महिन्यापासून वेगवेगळे आंदोलन करून सुद्धा फक्त लेखी आश्वासने देत आहेत. सोमवारी दुपारी मानवत तालुक्यामधील लोहरा व मंगळूर गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर घेराव घालण्याचे प्रयत्न केला.
साबा विभागातील अधिकारी व कर्मचारी झाले नोट रीचेंबल
मात्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप लावून आत्मदहन (self-immolation) करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र शहरातील नानलपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आत्मदहन करणाऱ्या व गावकऱ्यांना ताब्यात घेतले पुढील कारवाई सुरू दरम्यान आमदार राजेश विटेकर यांनी घेतली. आंदोलन कर्त्यांची भेट सविस्तर चर्चा केली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.