परभणी(Parbhani) :- शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. जडवाहनामुळे उडणार्या धुळीने परभणीकर त्रस्त झाले आहेत. अनेकांना श्वसनाचा त्रास (Respiratory distress) जाणवत आहे. नागरीकांतून ओरड सुरु असताना मनपा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जडवाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास
वर्दळीच्या वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड यासह मुख्य रस्त्यावरुन दुचाकी, अॅटोरीक्षा, चारचाकी वाहनांसह जडवाहनांची सतत वाहतुक सुरु असते. जडवाहनामुळे उडणार्या धुळीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, वृध्दांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. वाहनधारकासह नागरीकांतून धुळीच्या निर्मुलनासाठी (elimination) उपाय योजना राबविण्याची मागणी होत आहे. मात्र मनपाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. धुळीकडे कोणी लक्ष देणार आहे का नाही ? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.