परभणीतील पूर्णा पोलीस ठाण्यात पंचायत समिती अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani) : स्वत:च्या पदाचा गैरवापर करुन मौल्यवान रोखे बनवत बिलाचे बनावटीकरण करुन 1 कोटी 83 लाख 77 हजार 844 एवढ्या शासकीय निधीचा अपहार (Embezzlement of Government Funds) करण्यात आला आहे. याबाबत पूर्णा पंचायत समितीचे (Panchayat Committee) गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड (Mayurkumar Andelwad) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 7 जानेवारी रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात (Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पं. स. तील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह खाजगी इसम आहेत.
फिर्यादी हे शासकीय काम करत असताना, त्यांच्यासमोर आलेल्या कागदपत्रात (Document) खोटे देयक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बँकेकडे (Bank) चौकशी केली असता सदर देयक यापूर्वीच दिलेले असल्याचे निदर्शनास आले. देयकावरील खाते क्रमांक देखील त्रयस्थ व्यक्तीचा होता. सदरची बाब गंभीर असल्याने त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Zilla Parishad Chief Executive Officer) यांनी लेखा विभागातील (Accounts Department) अभिलेखांची चौकशी करण्याबाबत कळविले. चौकशीमध्ये अपहाराबाबत कार्यवाहीसाठी समितीला आदेशीत करण्यात आले. चौकशी अहवालात पंचायत समिती पूर्णा येथे ऑक्टोबर 2021 ते मे 2023 या कालावधीत 1 कोटी 83 लाख 77 हजार 844 इतक्या निधीचा अपहार झाल्याचे पुढे आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ सहाय्यक एम.बी. भिसे, सहाय्यक लेखा अधिकारी एस.के. पाठक, तत्कालीन गटविकास अधिकारी सौ. एस.के. वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे.व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरिंग, शेख अजहर शेख समद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.