परभणी (Parbhani):- मध्यरात्रीच्या सुमारास लाईट गेल्याने गॅलरीतुन तोल जावून घरावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्माक मृत्युची (sudden death) नोंद करण्यात आली आहे.
अंधारात गॅलरीमधून तोल जावून पडल्याने जखमी होऊन मृत्यू
मनोज सुभाष खराडे वय ४० वर्ष रा. नागराज कॉर्नर असे मृतकाचे नाव आहे. या बाबत साहिल खराडे यांनी खबर दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना घरासमोर काहीतरी पडल्याचा आवाज आला. बाहेरून पाहणी केल्यावर लाईट गेलेली दिसून आली. या अंधारात मनोज खराडे हे रोडवर पडलेले दिसले. त्यांना गंभीर जखमा (Serious injuries) झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मनोज खराडे मयत झाल्याचे सांगितले. अंधारात गॅलरीमधून तोल जावून पडल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्माक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नानलपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहरातून २१ वर्षीय युवक बेपत्ता
परभणी : शहरातील नांदखेडा रोडवरील प्रताप नगरात राहणारा २१ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. या बाबत २३ ऑगस्ट रोजी नानलपेठ पोलीसात खबर देण्यात आली आहे. अनिकेत अनंत मोरे वय २१ वर्ष असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. या बाबत अनंत मोरे यांनी खबर दिली आहे. नानलपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.