राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन!
परभणी (Parbhani) : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती (Legal Services Committee), पाथरी आणि वकील संघ, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीच्या पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश क. स्तर जयक्रांती पांचाळ होत्या, तर पॅनल विधिज्ञ म्हणून डी. बी. निसर्गंध यांनी काम पाहिले.
या लोकन्यायालयाला (People’s Court) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. न्यायालयातील प्रलंबित 269 प्रकरणांपैकी 37 प्रकरणे तडजोडीतून निकाली निघाली, ज्यामुळे 26,11,518 रुपये वसुल करण्यात आले. वादपूर्व नोंदवलेली 877 प्रकरणांपैकी 16 प्रकरणांत तडजोड झाली असून, त्यातून 21,55,000 रुपये वसूल करण्यात आले. एकूण 47,66,518 रुपयांची वसुली करण्यात लोकअदालतीला यश मिळाले.
या यशस्वी आयोजनात न्यायाधीश जयक्रांती पांचाळ, पॅनल विधिज्ञ डी. बी. निसर्गंध, पाथरी वकील संघाचे अध्यक्ष ए. डब्ल्यू. गालफाडे, उपाध्यक्ष बी. एल. रोकडे, सचिव व्ही. एस. गात, कोषाध्यक्ष बी. एस. पोटभरे तसेच सर्व विधिज्ञ, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचारी (Court Staff) यांनी मोलाचे योगदान दिले.