परभणी (Parbhani) :- तोटा भरून काढण्याच्या नावाखाली एस. टी. महामंडळाच्या वतीने १५ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यात सुविधांच्या नावावर बोंबाबोंब, जुनाट बसमुळे प्रवाशी त्रस्त अशी अवस्था असतांना या प्रचंड दरवाढीमुळे (price hike) तुलनेत रेल्वेचा दर हा अत्यल्प असल्याने प्रवासी हे रेल्वे व खासगी वाहनांकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवाढीचा निर्णय एस.टी. महामंडळाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेथे पर्याय नाही तेथेच एस.टी. ने प्रवास होत आहे.
जुनाट बसमुळे प्रवाशी त्रस्त
परभणी हे जंक्शन असल्यामुळे अगदी भारताच्या कोणत्याही कोपर्यात जायला येथून रेल्वेगाड्या उपलब्ध आहे. रेल्वे व बस तिकीट यामध्ये मोठी तफावत आहे. परिवारा सोबत प्रवास करायचा म्हटला तर प्रवाशाचे एकावेळी शेकडो रूपये वाचू शकतात. एकतर तिकीट जास्त व जुनाट बसचे झटके व खळखळाट. दुसरीकडे वेळ कमी, तिकीट कमी यामुळे नागरिकांचा कल हा रेल्वेकडे वाढला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रिझर्व्हेशनशिवाय(Reservation) प्रवास करणे शक्य नसलेतरी परभणी येथून पुणे, औरंगाबाद, मुुंबई, नागपूर जायला दररोज रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यामुळे रिझर्व्हेशनचा ताणही कमी झाला आहे. तिकिट भाड्याचा विचार करता परभणी येथून संभाजी नगरचे जूने बसचे भाडे २९५ रू. होते.
परभणी येथून संभाजी नगरचे जूने बसचे भाडे २९५ रू.
दरवाढीनंतर आता ३४५ रुपये मोजावे लागत आहेत. रेल्वेने आरक्षणासह गेले तर १२० रुपयांपर्यंत भाडे पडते. पॅसेंजरने गेलात तर ७० रूपयाचे भाडे पडते. संभाजी नगर, पूणे जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. बस दर वाढी नंतर पुण्याचे भाडे आता ६९४ रुपये मोजावे लागत आहे. पूर्वीच्या भाड्यात ९४ रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी बहूजन हिताय, बहूजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन जाणार्या महामंडळाने प्रचंड केलेली दर वाढ ग्रामीण भागातील प्रवाशांचा खिसा रिकामा करणार आहे. त्यामुळे प्रवाशी खाजगी वाहन आणि रेल्वेगाड्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.