जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ४७४ कोटींची थकबाकी…
– परभणी ग्रामीण मध्ये सर्वाधिक ९० लाख थकीत..
– वसुली करिता महावितरण सरसावले…
– धडक मोहीमे करिता ३२ पथकांची नेमणूक…
परभणी (Parbhanit Mahavitaran) : वारंवार वीजबील भरण्याचे आवाहन करूनही विज बिल न भरणाऱ्या जिल्ह्यातील थकबाकीदारांचा महावितरणलाच शॉक बसला.. असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे महावितरणचा तब्बल ४७४.३१ कोटींच्या थकबाकीचा डोंगर आहे.. यात सर्वाधिक थकबाकी ही परभणी ग्रामीण ची असून या थकबाकी वसुली करीता महावितरण ने धडक मोहीम हाती घेतली असून ग्राहकांकडून थकीत वीजबिल वसुली करिता ३२ पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती (Parbhanit Mahavitaran) महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता जी.के. गाडेकर यांनी दिली आहे. ग्राहकांनी विज बिल भरून सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
दिलेल्या मुदतीत बिलांचा भरणा न केल्याने (Parbhanit Mahavitaran) महावितरणच्या जिल्ह्यातील थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात तब्बल ४७४.३१ कोटींची महावितरणची थकबाकी असून सदरील थकबाकी वसुलीकरिता महावितरणचे अधिकारी सरसावले असून विजबिल वसुली,वीज चोरी पकडणे, तसेच कायमस्वरूपी पुरवठा खंडित ग्राहकांची तपासणी यासाठी शाखा कार्यालय निहाय तब्बल ३२ वसुली व भरारी पथकांची नियुक्ती महावितरण ने केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी विज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन (Parbhanit Mahavitaran) महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महावितरणची तालुकानिहाय थकबाकी पुढील प्रमाणे:
पाथरी तालुका – ५१.७५ कोटी
पूर्णा तालुका – ५१.६३ कोटी
परभणी ग्रामीण – ९०.४ कोटी
परभणी शहरी – २८.७९ कोटि
सेलू तालुका – ७८.१७ कोटी
जिंतूर -८६.६७ कोटी
पालम – १२.३७ कोटी
सोनपेठ – २४.१८ कोटी
गंगाखेड – २४.४४ कोटी
मानवत – २६.२७ कोटी..
याप्रमाणे जिल्ह्यातील थकबाकी चा आकडा हा ४७३ कोटी ३१ लाख रुपये असा आहे..!
ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे. थकित वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे (Parbhanit Mahavitaran) सातत्याने प्रयत्न चालू आहेत. याचबरोबर ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी वेळोवेळी आवाहनही केले आहे. मात्र बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केले जात असल्याने ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे…
– रुपेश टेंभुर्णे, अधीक्षक अभियंता, महावितरण परभणी.
रेशमे यांच्याकडे नांदेड परीमंडळाचे पालकत्व …
महावितरण चे प्रकल्प संचालक श्री. रेशमे यांच्याकडे नांदेड परिमंडळाचे पालकत्व असून वीज बिल वसुली,वीज वितरण हानी कमी करणे ,तसेच सध्या चालू असलेल्या कृषी वाहिनी विलगीकरण या (Parbhanit Mahavitaran) योजनेमध्ये गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
मार्च एंड पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट…
जिल्ह्यातील महावितरणची (Parbhanit Mahavitaran) थकबाकी पाहता महावितरण ने कडक पावले उचलले आहेत. ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसुली करण्याकरिता महावितरण ला सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच थकबाकी वसुली ही मार्च एंड च्या आत केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.