परभणीतील पालम ते पेठ पिंपळगाव मार्ग…
पालम (Parbhani) : पालम येथून पेठ पिंपळगाव ते राणीसावरगाव जाणार्या रोडचे काम (Road Work) व्हावे म्हणून या भागातील लोकप्रतिनिधी यांचे सह विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी जनतेच्या मदतीने अनेक वेळा आंदोलने उपोषणे करून प्रशासकीय यंत्रणेला जाग आणलेली होती व त्या आंदोलनांची दखल घेऊन या रोडचे काम चालू करण्यात आले. या रोडचे पूर्वीचे जुने असलेले खडी शिल्लक असलेले डांबर (Asphalt) त्याचबरोबर उपयोगात नसलेली मातीसह सर्व मटेरियल बाजूला काढून मुरमाचे थर टाकून त्यानंतर खडीसह इतर मटेरियल टाकून रोडचे काम मजबूत करणे गरजेचे आहे.
नियंत्रण ठेवणारे अभियंता मूग गिळून गप्प!
सद्यस्थितीमध्ये काम करणारे गुत्तेदार हे कुठेतरी कामांमध्ये निष्काळजीपणा करून मुरमाचा जास्तीचा वापर न करता याच रोडवर खोदण्यात येत असलेल्या उपयोगात न येणारे मटेरियल अगोदर टाकून त्यावर अल्प प्रमाणात मुरून टाकत निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत असे घडत असताना सुद्धा या कामावर नियंत्रण ठेवणारे अभियंता (Engineer) हे मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या डोळ्यांमध्ये धुळफेक!
एकीकडे दर्जेदार कामे व्हावीत म्हणून शासन (Government) भरघोस निधी उपलब्ध करून देत आहे. तर दुसरीकडे निकृष्ठ दर्जाचे काम करून शासनाच्या डोळ्यांमध्ये धुळफेक करून कमी खर्चात कामकाज कसे करून देत जास्तीत जास्त पैसा कसा शिल्लक राहिल याचा विचार करत आहेत. त्यांच्या या सर्व बाबीला या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोणत्याही प्रकारचा विरोध करत नसल्यामुळे या यंत्रणेचा सुद्धा पाठिंबा आहे की काय? एकीकडे गुत्तेदाराच्या वतीने मुरमा ऐवजी खोदलेल्या मातीचा व जुन्या खडीचा उपयोग या ठिकाणी भर म्हणून केला जात आहे.
वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने काम हे दर्जेदार व्हावे…
या सर्व मटेरियलवर जे काही रोडचे काम होणार आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होणार असून तो रोड जास्त दिवस टिकेल याची शास्वती देता येत नाही. अगोदरच जे काही खड्डे होते त्या खड्ड्यांमध्ये प्रवास करून या भागातील जनता वैतागलेली होती. त्यातच अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्याने तयार होणारा रोड हा किती दिवस टिकेल याची चिंता या रोडवरून जोडलेल्या गावातील नागरिकांना (Village Citizen) व प्रवाशांना पडलेली आहे. याकरिता वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) व कर्मचारी यांच्या वतीने काम हे दर्जेदार व्हावे. यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.