अमृतभारत योजनेतून नव्याने होणार ईमारतीची उभारणी
Parbhni:- सुमारे सव्वाशे वर्षांतील रेल्वेचे कडु गोड अनुभव पचवलेली, विकासाची वेगवेगळी रुपे अनुभवलेली व ईतर अनेक घटनाप्रसंगांची साक्षीदार असलेली पूर्णा रेल्वे स्थानकाची(Railway station) ब्रिटिशकालीन ईमारत जमिनदोस्त करण्यात येत असून, आता अमृतभारत योजनेत(Amrit Bharat Yojana) नव्या कायापालटासह ही ईमारत पुन्हा उभारली जाणार आहे.
मनमाड- काचीगुडा लोहमार्गावर पूर्णा हे रेल्वेचे मध्यवर्ती, महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात १८९९ मध्ये मनमाड ते सेलु मिटरगेज रेल्वेमार्ग अस्तीत्वात मराठवाड्यात प्रथमच यानिमित्ताने रेल्वेचे पाऊल उमटले. लगेचच ई.स १९०० सेलु ते हैद्राबाद पर्यंत हा रेल्वे मार्ग विस्तारीत झाला. त्याच वेळी पूर्णा हे रेल्वे स्थानक बनुन रेल्वेच्या पटलावर आले. त्यामुळे सहाजिकच रेल्वे स्थानकाची भव्य ईमारत ऊभी राहीली.यामार्गावर पूर्णा हे भौगोलिक व प्रशासकीय दृष्ट्या केंद्र असल्याने इंग्रजानी त्याचे महत्त्व ओळखले व या रेल्वे स्थानकाला अधिक विकसित करण्याचे प्रयत्न चालवले.
ईमारतीचे विस्तारीकरण होऊन रेल्वेची अनेक उपविभागीय कार्यालय येथे सुरू
दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा एक नवा मिटरगेज मार्ग संकल्पीत केला गेला. प्रारंभी १९१२ मध्ये पहील्याच टप्प्यात पूर्णा ते हिंगोली असाहा मार्ग कार्यान्वित झाला त्यामुळे पूर्णा रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाला. हळूहळू हा मार्ग पूर्णा ते खंडवा असा विस्तारीत झाला. सहाजीकच ठिक ठिकाणच्या व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या येथून धाऊन लागल्या. रेल्वे स्थानक ईमारतीचे विस्तारीकरण होऊन रेल्वेची अनेक उपविभागीय कार्यालय येथे सुरू झाली. साधारण ५०० मिटर लांबीच्या विस्तृत क्षेत्रात रेल्वेची निरनिराळे कार्यरत राहीलेली आहेत. या ईमारतीत ब्रिटिश व निजामकालीन वास्तुंच्या (British and Nizam period architecture) पाऊल खुणा आजही दिसून येतात. ही दगडी ईमारत आजही मजबूत स्थितीत राहीलेली दिसते. विकासाच्या नव्या टप्प्यावर तीचे रुपडे आता बदलले एवढेच.
रेल्वे विकासाच्या अनेक अवस्था या स्थानकाने अनुभवल्या प्रारंभी मिटरगेज, ब्राॅडगेज, दुहेरीकरण विद्युतीकरण, या टप्प्यांची ही ईमारत साक्षीदार बनली. कोळयावर चालणारी वाफेची इंजिने त्याचा खडखडाट डिझेलवर चालणा-या इंजिनांचा स्पर्श या रेल्वे लाईनवर झाला. कधी वैभवाची तर कधी कार्यालय स्थलांतरामुळे निर्माण झालेली क्षतीग्रस्तेची स्थिती असाही अनुभव या ईमारतीला आला.
ब्रिटीशांनी व त्यानंतर निझामकळात एक मोठं केंद्र म्हणून पूर्णा रेल्वे स्थानक नावारुपाला आले. येथून कापसाची निर्यात होत असे हे ठिकाण ‘पुलींग पाॅईन्ट'(Pulling point) म्हणून ओळखले जाई. या इमारतीच्या परिसरात सर्वसामान्य प्रवाशांपासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar), जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आदीं नामांकित व्यक्तीचा पदस्पर्श येथे भुमीस झालेला आहे. अनेक घटनाप्रसंगांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होताना हळहळ वाटते तर नव्याविकासाची आस असल्याने तीच्या आधुनिक रुपा बाबत उस्तुकताही रेल्वे वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये दिसून येत.
इंग्रजांकडून नियमीत स्ट्रक्चरल ऑडिट
स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योयत्तर काळातील हैद्राबाद संस्थानातील पूर्णा रेल्वे स्थानक ईमारतीचे तसेच पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाचे इंग्रजांकडून सातत्याने व नियमीत स्ट्रक्चरल ऑडिट होत असे ही बाब विशेष उल्लेखनीय होय. केंद्र शासनाच्या अमृतभारत योजनेत पूर्णा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला असून, स्थानकाच्या दोन्ही बाजुकडील ईमारतींची पुनर्रचना करण्यात येणार असून विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबीं उभारल्या जाणार आहेत. सुमारे २३ कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतूद या कार्यासाठी करण्यात आलेली आहे. स्थानक पुर्नरचनेत रेल्वे सेवा विषयक सोई सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.